सिध्दता : केव्हा, कोठे, कशी व कशासाठी

कार्यारंभी श्री भैरवनाथांनी वंदनीय दादांना जगाच्या कल्याणार्थ ॐकाराचा एक दिव्य अनुभव दिला होता. १९७७ ते १९७८ दरम्यान परमपूज्य बाबांच्या मार्गदर्शनानुसार दादांनी श्री क्षेत्र नरसोबावाडी येथील श्रीनृसिंहसरस्वती महाराजांच्या पवित्र भूमीत हवन विधी व महारुद्र स्वाहाकार करून ॐकाराचे प्रखर स्वरूप - स्त्री व पुरुष  असा  भेद  न करता भक्तांमध्ये प्रवाहित करण्यासाठी सौम्य केले. तद्नंतर भक्तांना महाकारण दीक्षा देऊन जीवनाचे सार्थक आणि त्याच वेळी इतरांचे कल्याण करण्याची क्षमता असलेली ॐकार साधनेच्या सिद्धतेची सुरुवात केली. या सिद्धतेचे अलौकिकत्व असे कि उत्पती – स्थिती -लय या शक्ती ज्या विविध देवदेवतांच्या माध्यमातून प्रकट होतात अशा सर्व देव देवतांचे आशीर्वाद विभूतींच्या मार्गदर्शनानुसार वंदनीय दादांनी त्या त्या संबंधित पवित्र स्थळी जाऊन प्राप्त केले. १९८७ मध्ये बलिप्रतिपदा या दिवशी ॐकार साधना व जगद्गुरू नामस्मरण ‘ॐ श्री साईनाथाय नम:’ याची पूर्णत्वाने सिद्धता केली.

ॐकार साधना एखाद्या साधकाच्या माध्यमातून उपासना म्हणून कार्यान्वित होतांना त्या क्रियेची परिणती अथवा फलश्रुती कशात होते याचे ज्ञान झाले तरच जीज्ञासू किंवा मुमुक्षु हि साधना करण्यास उद्युक्त होतील. विश्वशांती आणि विश्वात्मकता जर साध्य करावयाची असेल तर ती प्राप्त करण्याचे साधनही सूक्ष्म असले पाहिजे तरच ते विश्वव्यापी होईल. ‘ॐ’ हा अनाहत ध्वनी सूक्ष्म आहे व याला भाषा, देश, वर्ण,वंश, धर्म या मर्यादा नसल्यामुळे विश्वव्यापी आहे. नाथ परंपरेप्रमाणे साधनसेवा संचित न करता सेवन करून रक्तात धारण करायची असते, त्यामुळे गुरुकृपाशीर्वाद विर्यातून किंवा स्त्रीबिजामधून संततीकडे प्रवाहित होतो. रक्तामध्ये धारण झालेली गुरुशक्तीची वलये साधकाच्या शरीर माध्यमातून नकळत बाहेरील वातावरणात वलयरूपाने प्रवाहित होतात.

या कार्यपद्धतीत शक्तीचे संक्रमण गुरुमाध्यमातून भक्तात झाल्यामुळे गुरु निराकार होऊन भक्त साकार होतो व तो इतरांना साकार करण्याचे कार्य साधनेद्वारे करतो . भविष्यात गुरुशक्ती ॐकार साधनेद्वारे कार्यान्वित व्हावी व मानवी जीवन ईश्वरमय व्हावे अशी परमपुज्य बाबांची योजना आहे. दादांनी जणू त्यासाठीच जन्म घेतला होता. त्यांनी बाबांच्या आज्ञेने ‘ॐ’ हा ध्वनी सिद्ध करून सामान्य माणसाच्या जीवनात तो दैनंदिन साधना या स्वरुपात स्थित्यंतरित केला. या सिद्ध केलेल्या ॐकार साधनेद्वारे देहिक-आत्मिक व गुरुशक्ती अशा त्रिगुणात्मक शक्तीचे एकरूपत्व साधकाच्या ब्रह्मरंध्राचे ठिकाणी धारण होते व साधकाचा नरदेह काय-वाचा-मन या माध्यमातून इतरांचे कल्याण करू शकतो. किंबहुना असा नरदेह शक्तीपीठा सारखे कार्य करतो. म्हणजेच साधकाचे पूर्वी कर्माधीन असलेले जीवन गुरुकृपाशिर्वादाधीन होते. यापेक्षा दुसरी कुठलीही मुक्ती अधिक श्रेष्ठ असणे संभवतच नाही.

‘भावार्थ मार्गदर्शिका‘ (खंड पहिला) या पुस्तकासोबत  किंवा स्वतंत्रपणे  "ॐकार साधना" ही साधनेचे संपूर्ण प्रशिक्षण व प्रात्यक्षिक अंतर्भूत असलेली शैक्षणिक स्वरुपाची DVD देत आहोत. त्यातील सूचनांचे तंतोतंत पालन केल्यास मध्यस्थाच्या मदतीशिवाय जिज्ञासूंना घरबसल्या प्रशिक्षण मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.

अशी एक शक्यता संभवते की २७ मिनिटांची संपूर्ण साधना करण्यास वेळ नाही अथवा भाषेच्या अडचणीमुळे शक्य नाही. अशावेळी, ज्यांचा केवळ ध्वनीशी संबध आहे असे २१ लघु ॐकार, २५ दीर्घ ॐकार (पाच न्यास) आणि स्वभाषेतील ‘दैनंदिन प्रार्थना’ एवढी केवळ १२ मिनिटे कालावधी असलेली संक्षिप्त ॐकार साधना केली तरी पुरेसे आहे. वंश, धर्म, भाषा, देश अशी कुठलीही मर्यादा नसलेली ‘संक्षिप्त  ॐकारसाधना’  खर्‍या अर्थाने विश्वव्यापीच आहे.

१) श्री साई समाधी मंदिरात शिर्डी येथे दादांनी सिद्ध केलेल्या व आमच्या ट्रस्टच्या साधकांनी स्वर, ताल, लयीत म्हंटलेल्या “ॐ श्री साईनाथाय नमः” या मंत्राचा उदघोष नित्याने केला जातो तसेच हेच नामस्मरण संस्थानाच्या दूरध्वनी वर hello tune म्हणून वापरले जाते.

२) ट्रस्ट निर्मित "ॐकार साधना मार्गदर्शिका" या साधनेच्या डीव्हीडीचा प्रकाशन समारंभ स्वरभास्कर पं भीमसेन जोशी व गान सरस्वती विदुषी किशोरीताई आमोणकर यांच्या शुभहस्ते शिर्डी संस्थानचे तत्कालीन अध्यक्ष श्री द. म. सुकथनकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. श्री साई संस्थानाने डिव्हिडिच्या निर्मितीच्या सुमारे रुपये ४ लाखाच्या खर्चाची परिपूर्ती आमच्या ट्रस्टला केली यासाठी आम्ही संस्थानाचे सदैव ऋणी आहोत. तसेच प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाच्या सुमारे ६००० डीव्हीडींची विक्रीची व्यवस्था शिर्डी संस्थानाने केली होती.

संकेतस्थळावर ॐकार साधनेच्या ‘प्रशिक्षण’ व ‘प्रात्यक्षिकाचा’ काही भाग प्रक्षेपित केला आहे. च्या  ऐवजी ... संकेतस्थळावर संपूर्ण आणि संक्षिप्त ॐकारसाधना प्रक्षेपित केली आहे.

साधनेच्या DVD मध्ये – एकुण ८ ट्रॅक्स आहेत.  ट्रॅक १ व ८ मध्ये श्री साई स्तवनपर पदे आहेत. उर्वरीत ट्रॅक्स २ ते ७ मधील तपशील.

 

ट्रॅक क्र. ॐकार साधना प्रात्यक्षिक वेळ/ मिनिट
प्रस्तावना:  सिद्धता – सर्वव्यापकता – उपयुक्तता
प्रशिक्षण : स्वर – ताल – लय
प्रशिक्षण : साधनेची पूर्वतयारी
प्रशिक्षण : लघु ॐकार व न्यास
प्रशिक्षण : ईशस्तवन, मारुती स्त्रोत्र, जगदगुरूनामस्मरण, महामंत्र जगदगुरूनामस्मरण प्रार्थना. ११
प्रात्यक्षिक : संपूर्ण ॐकार साधना
भाग १ भाग २
२७

ट्रस्टतर्फे साधनेच्या प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे.

जास्तीत जास्त जिज्ञासूंनी त्याचा लाभ घ्यावा अशी श्री सद्गुरुचरणी प्रार्थना